College life म्हणजे खर तर शिक्षकांच्या दृष्टिकोनातून एक कसोटीच किंवा करिअरची सुरुवात पण आम्हा मुलांच्या दृष्टीकोनातून college life म्हणजे मजा मस्ती करणारे दिवस. अर्थात आलेला प्रत्येक दिवस आनंदी आणि उत्साही कसा करायचा हाच प्रत्येक विद्यार्थी विचार करत असतो. मुळातच college life प्रत्येक मुलगा जगत असतो मग ते डेज असुदेत नाहीतर कुठल्यातरी कार्यक्रमाचं आयोजन असुदेत किंवा ट्रीप असुदेत प्रत्येक विद्यार्थ्याचं सहभाग हा असतोच.
अशीच एक गोष्ट काही दिवसांपूर्वी आम्ही ECDM च्या विद्यार्थ्यांनी अनुभवली अर्थातच मुलांच्या अगदी जवळ असलेली आणि त्यांच्या आनंदाचे काही क्षण आपल्या सीनिअर आणि ज्युनिअर सोबत एकत्र घालवणारी गोष्ट म्हणजे study tour.
आपण कितीही फिरलो तरी आपल्या senior's आणि junior's सोबत जी मज्जा आहे ना ती कशातच नाही हे मात्र नक्की..!✌️आम्ही सगळेजण खूप वेळा महाबळेश्वर ला जाऊन आलो होतो ते ठिकाण आमच्यासाठी काही नवीन नव्हते पण तरी देखील आम्ही आमच्या ज्युनिअर आणि सिनियर सोबत गेलो कारण मला असे वाटते की आपण कुठे जातो याच्यापेक्षा आपण कोणासोबत जातो याने जास्त फरक पडतो...😌. आणि सोबत आपले शिक्षक ज्यांना आपण कॉलेज मध्ये नेहमी शिस्तप्रिय आणि शांत पाहतो ते इतर वेळी कसे आहेत हे देखील आपल्याला अनुभवायला मिळते...😊 असो काही गोष्टी आपण अनुभवल्यानंतर कागदावर उतरवल्या तर त्या कायम लक्षात राहतात असे मला वाटते म्हणून माझा हा छोटासा प्रयत्न..!✨
तर सरांनी सांगितले की आपली स्टडी टूर ही महाबळेश्वरला मॅप्रो ला जाणार आहे. प्रत्येक जण हा आतुर होता टूर ला जायला, म्हणूनच contribution लगेच जमा झाले आणि परवानगी देखील लगेच भेटली आणि tour ची तारिक देखील निश्चित झाली ती म्हणजे १२/१२/२२. राहिले होते दोन दिवस प्रत्येक जण तयारी करत होता. आमचे सिनियर म्हणजेच (TY) चे विद्यार्थी यांच्यावर ज्युनिअर ची जबाबदारी होती त्यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था इथपासून ते बस मध्ये गाणी कोणती आणि कशी लावायची इथपर्यंत सगळी कामे व्यवस्थित पार पडली...
खर तर त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत कारण त्याच्या विश्वासावर आम्ही सगळे जण होतो आणि त्यांनी त्याची जबाबदारी अगदी छान पार पडली. आता उरला होता शेवटचा दिवस फक्त एक रात्र ती संपायची सगळेजण वाट पाहत होते. कधी एकदा पहाट होईल असे झाले होते. आधल्या दिवशी सरांनी सगळ्यांना पुन्हा एकदा tour चा आराखडा सांगितला त्यानंतर बाहेर गावावरून येणाऱ्या मुलांची इथेच रूमवरती राहणाऱ्या मुलांसोबत सोय करून दिली, coordinator ला त्यांची कामं पुन्हा एकदा सांगितली. आता आम्ही सगळे जण पूर्णपणे तयार होतो tour ला जाण्यासाठी आता उरली होती ती फक्त एक रात्र आणि ती सहजासहजी जाणार नव्हती. आपल्याला हे काय नवीन नाही दुसऱ्यादिवशी बाहेर जायचं असेल तर आधल्या रात्री झोप लागत नाही अगदी तसच झालं होत माझ्यासोबत. जाग येईल की नाही म्हणून जरा जास्तच गजर लावले आणि बगता बगता डोळा लागतो ना लागतो गजर वाजयला सुरुवात झाली. अर्थातच मी अख्खी रात्र झोपले नव्हते आणि लागली तेव्हा पहाट झालीहोती मग मी उठले माझं सगळ आवरून घेतल तेव्हा वाजले होते पहाटेचे ४. माझ्या रूम मधल्या मुली उठतील म्हणून मी जरा हळुच आवरत होते. कॉलेज वरती जायचं टायमिंग होता ४:३० उशीर नको म्हणून मी १५ मि. आधीच निघाले माझ्या रूम पासून कॉलेज अगदी चार पावलांवर्ती आहे म्हणून मी चालतच निघाले बगता बगता कॉलेज चे गेट आले पण मला मुल अगदी बोटांवर मोजण्याइतकीच दिसत होती. मी आत जाऊन थांबले ज्युनिअर होत्या तिथे त्यांच्यात जाऊन बसले ४:३० चे ५ होत आले तरी बस चा ठावठिकाणा नव्हता. सर देखील ५ ला आले, त्यांना थोडे लांबून यायचं होत म्हणून थोडा उशीर झाला. तेवढ्या वेळात मुलांनी मस्त फोट वैगेरे काढून घेतले ज्यांना vlogging करायची होती त्यांनी पण करून घेतली बगता बगता ५:३० झाल्या आता मात्र मुलांना अनावर होत होते पण तोपर्यंत बस college च्या गेट वर आली होती. तेवढंच मुलांना समाधान वाटले. प्रत्येक जण त्याचा नादात गुंग होता. पण सर मात्र त्यांचं काम करत होते. किती जन आहेत? किती जण राहिलेत सगळ पाहत होते मग त्यांनतर सर्व जण आहेत अशी खात्री झाल्यानंतरच सरांनी गाडीमध्ये बसण्यासाठी परवानगी दिली. सरांनी आधीच ठरवून दिले होते की सीनिअर पुढे बसतील आणि ज्युनिअर मागे मग त्याप्रमाणे आम्ही सगळेजण बसलो.
आमच्यासोबत दोन सर अर्थातच सोरटे सर , आणि या वर्षीच नवीन आलेले पवार सर. त्यांनी अगदी सहज सगळ्यांना आपलंसं करून घेतलं. कधी वाटल नव्हत आम्हा सगळ्यांना की आमच्यात एवढं चांगल नात निर्माण होईल आणि सगळ्यात स्पेशल व्यक्ती आमचे सोरटे सर घेऊन आले होते ते म्हणजे त्यांची बायको तशी कल्पना होतीच आम्हाला की त्या येणार आहेत. पण तरीही उत्सुकता होतीच तश्या त्या थोड्या वेळ शांतच होत्या म्हणजे आपण नवीन लोकात गेल्यावर शांतच तर असतो जरा रुळायला वेळ हा लागणारच. तरीही त्या आमच्यात लगेच मिसळून गेल्या त्यांचा स्वभाव अगदी मनमिळाऊ होता. समजलच नाही आम्हाला त्या आमच्यात पहिल्यांदाच आल्या होत्या असं वाटतं होत की आमची आधीपासूनच ओळख आहे...... तर आता शेवटचे सर त्याच्याबद्दल थोड सांगते. खरंतर सांगायची गरज नाही पण थोडक्यात सांगते सिद्धार्थ सर आहेत म्हनून आम्ही आहे. या सगळ्याचे सुत्रधार आणि आमच्या ECDM department ची शान म्हणजे आमचे सिद्धार्थ सर. त्यांच्यासोबत राहून हे नक्की समजल आहे काहीही झालं तरी आपणच बाप ! .......असे हे आमचे सर बिंदास नेहमी आमच्या activity ला motivate करणारे, अगदी मनमिळाऊ त्यांच्या सारखे सर आम्हाला शाळेत असताना कधी भेटलेच नाहीत. खरंच आपण खूप नशीबवान आहोत आपल्याला असे आपल्या प्रत्येक गोष्टीत साथ देणारे सर भेटेल आहेत.
आता आपण आपल्या विषयाकडेवळूया तर असे आम्ही सगळे जण आमच्या tour साठी पूर्णपणे तयार झालो होतो. त्यानंतर ड्रायव्हर काकांनी गाडी चालू केली. आम्ही श्रीगणेशा केला आणि बस निघाली आमच्या मार्गाकडे सगळेजण आपापल्या नादात होते कोणी बॅग ठेवत होत, कोणी गाणी ऐकत होत ,कोणी गप्पा मारत होत, तर कोणी मोबाईल मध्ये डोके घालून बसले होते. senior's मात्र पुढचे नियोजन करत बसले होते..... त्यानंतर (SY) च्या मुलांना गाणी लावण्याचे काम दिले त्यांनी सुरुवात केली गाणी लावायला. सर्वात पाहिलं गाणं होत गणपतीचं त्यानिमित्ताने सर्वांना बाप्पांचं स्मरण झालं. त्यानंतर मग खरी सुरुवात झाली. मस्त मस्त गाणी लावली होती. सगळेजण हळूहळू नाचायला उठले एक एक करत करत जवळ जवळ सगळी बसच नाचू लागली. प्रत्येक जण आपापल्या तलाताच नाचत होते. हळू हळू आमची दोनी लाडके सर आमच्यासोबत नाचू लागले तेव्हा मात्र मुलांच्या आनंदाला पारा नव्हता. सगळीकडून नुसता शिट्यानचा आवाज येत होता .

आम्हाला ह्या गोष्टीचा आनंद होत होता की senior's आणि junior's एकत्र येऊन आपला वेळ घालवत होते आणि एकमेकांना समजून घेत होते. कोणी नकळत खोड्या करत होत....😁 तर कोणी त्यांची मज्जा घेत होते..... आम्ही मात्र आमच्याच धुंदीत मस्त नाचत होतो. प्रत्येक गाण्यावर ठुमके देत होतो. जवळ जवळ ७ वाजत आले तरी देखील आम्ही नाचत होतो. मग जरा थंड हवा खाण्यासाठी सरांनी वीर धरणावर गाडी थांबवली. तिथे आम्ही निसर्गाचे एक अनोखे रूप न्याहाळत होतो. मी देखील खूप रमून गेले होते. त्यानंतर आम्ही जरा धरणाजवळ गेलो. किनारी जरा वेळ थांबलो सकाळी सकाळी धुकानी सारे आभाळ झाकून गेले होते ते दृश्य खरंच अविस्मरणय होते. सगळे जण फोटो काढण्यात मग्न झाले होते मी मात्र निसर्गाचं हे सुरेख रूप हळूच न्याहाळत होते. बगता बगता वेळ कसा गेला समजलेच नाही. सरांनी आम्हाला बसमध्ये जायला सांगितले आम्ही सगळेजण बसकडे निघालो आणि आम्ही तेथून ८ वाजता निघालो. परत आमचा कार्यक्रम सुरू झाला परत गाणी लावली आणि सगळे जण नाचू लागली. काही वेळानंतर आमच्या सरांचा mood झाला म्हणून आम्ही जराशी Romantic गाणी लावली. आणि सगळे जण एका सुरात गाणी म्हणत होते सर देखील आमच्यात सामील झाले होते. मला ते गाणं अजूनही आठवतय (मैं चाहू तुजको मेरी जान बेपनाह ). मग त्यानंतर आम्ही नाष्टा करण्यासाठी ऑस्करवडी मिसळ इथे मिसळ खाल्ली त्याचा slogan खूपच छान होता!.. चवीच्या वाटा... इथेच येऊन थांबतात...! त्यानंतर आम्ही नाष्टा केला, पोटभर केला. हा ती गोष्ट वेगळी की नाष्टा पोटभर नाहीत करत 🤭
मग त्यानंतर आम्ही गाडी थेट मॅप्रोलाच नेऊन थांबवली. तिथे पास मिळेपर्यंत आम्ही फोटो काढत होतो आणि त्यासोबत निसर्गाचं दृश्य देखील न्याहाळत होतो. मग पास भेटल्यानंतर आम्ही आत गेलो आत जाताना आम्हाला फ्री मध्ये कँडीज दिल्या. त्यानंतर वेगवेगळे पेय ट्राय करायला दिले. त्यांची चव अगदीच छान होती. त्यांनतर आम्हाला मॅप्रो कंपनीचे चे काही व्हिडिओज दाखवले. कसे मॅप्रो उभा राहिले आणि कसे काम करत आहे हे सगळ त्या विडियोद्वारे आम्हाला समजले.

त्यानंतर मॅप्रो च्या कंपनी मध्ये प्रॉडक्ट कसे तयार होतात इथपासून ते कसे सेल करतात इथपर्यंत सगळे पाहायला मिळाल. त्यानंतर खरी मज्जा आली आम्हाला मॅप्रो च्या गार्डन मध्ये फेरफटका मारायला. प्रत्येकाने आपापल्या घरच्यांसाठी मॅप्रो च्या मॉल मधून खरेदी केली.
त्यानंतर आम्ही खूप सारे ग्रुप फोटोज काढले आणि थोडा वेळ विश्रांती घेतली आणि नंतर आम्ही निघालो परत बस कडे आणि आता आमची बस थेट निघाली होती वेन्ना लेक. तिथे जायला साधारण आम्हाला चार वाजल्या तिथे आम्हाला सरांनी एक तासाची मुभा दिली होती. आम्ही मस्त फोटोज काढले, घोडस्वारी केली, छानसं निसर्गाचं सौंदर्य मोबाईल मध्ये कॅप्चर केलं आणि लोकांच्या गर्दीचे निरीक्षण करत बसलो. त्यानंतर आम्ही निघालो महाबळेश्वरच्या मार्केटमध्ये तिथे आम्हाला सात वाजेपर्यंत फिरण्याची परवानगी भेटली होती.
त्यामुळे प्रत्येक जण खूप आतुर झाले होते बाजारात फिरण्यासाठी जाताना मात्र सरांनी आमची तलप पूर्ण केली ती म्हणजे चहाची. सरांनी आम्हाला चहा पाजला त्यांच्या स्वखर्चातून त्यानंतर प्रत्येक जण आपापल्या मित्र-मैत्रिणींसोबत ,कोणी ज्युनिअर सोबत तर कोणी सीनियर सोबत तर कोणी सरांसोबत महाबळेश्वरच्या बाजारात फिरत होते. वस्तू खरेदी करण्यासारख्या खूप होत्या पण किंमत जरा जास्तच होती. त्यामुळे जास्त वस्तू खरेदी करता नाही आली. बघता बघता वेळ कसा गेला समजलेच नाही.७ वाजत आले होते सगळेजण बस कडे निघाले होते. आम्ही देखील निघालो. थोडा आम्हाला वेळच झाला त्यामुळे सरांचा थोडा ओरडा तर आम्हाला खावाच लागला. त्यानंतर आमचं शेवटचं ठिकाण होतं ते म्हणजे आमचे घर. आता गाडी निघाली होती घराकडे अर्थातच बारामती कडे पण रात्रीचे जेवण अजून राहिले होते त्यामुळे साधारण नऊच्या सुमारास सरांनी गाडी एका हॉटेल वरती थांबवली. तिथे सरांनी आधीच सगळी सोय केली होती व्हेज खाणारी मुलं वेगळी आणि नॉनव्हेज खाणारे मुलं वेगळी. सगळ्यांनी अगदी पोटभरेपर्यंत जेवण केलं. त्यानंतर आम्ही तिथे जरा थांबलो आणि १० वाजता आमची बस निघाली बारामतीला. सगळ्यांचे जेवण अगदी फुल झालं होते. तरीदेखील आम्ही गाणी लावल्यानंतर नाचायला सुरुवात केली होती कारण आता उरले होते फक्त दोन तास. दोन तासात आम्ही आमच्या घरी जाणार होतो आणि शेवटच्या काही आठवणी आम्हाला आमच्या मनात ठेवायच्या होत्या... म्हणून आम्ही खूप एन्जॉय करत होतो. सगळेजण आपापल्या नादात पण एकमेकांची काळजी घेऊन कोणालाही धक्का न लागेल याची खात्री करूनच नाचत होते. सगळ्यांचे अगदी पाय दुखत होते. तरी देखील आम्ही सगळे बेफाम होऊन नाचत होतो कारण आत्ता असलेली वेळ पुन्हा येणार नाही आणि जरी आलीच तरी आपण ज्यांनच्यासोबत आहे ती व्यक्ती तेव्हा नसणार...
त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदात जगायचा असं मला वाटत....! जवळजवळ आम्ही बारामतीच्या जवळ आलो. सगळेजण आपापली वस्तू ,खाली पडलेली शूज😅, प्रत्येकाचे मोबाईल्स, आणि प्रत्येकाच्या वस्तू गोळा करून आपापल्या बॅगेत ठेवत होते. बघता बघता बारा वाजले आणि आम्ही कॉलेजच्या गेटवर पोहोचलो त्यानंतर प्रत्येकाचे पालक आले होते. सरांनी प्रत्येकजणांना घरी अगदी सुखरूपपणे पाठवले आणि घरी गेल्यानंतर त्यांना आठवणीने कॉल करायला सांगितला. त्यानंतर प्रत्येक जण आपापल्या घरी गेले...
सर देखील सगळी मुले घरी सुखरूप गेले आहेत की नाही याची खात्री करूनच घरी गेले आणि अशी ही आमची स्टडी टूर संपली घरी गेल्यानंतर एका गोष्टीची जाणीव झाली की आपण कितीही मोठे झालो .कितीही मोठ्या पदावरती गेलो किंवा कितीही लांब गेलो. परदेशात जरी गेलो तरी आठवणी कधी विसरता येत नाही त्या कायम लक्षात राहतात आणि म्हणूनच आठवणी ह्या चांगला असाव्यात अस मला वाटतं कारण त्या विसरण अशक्य असतं...
तर अशी ही आमची छोटीशी एक दिवसाची पण खूप सारी धमाल, मस्ती, एन्जॉय, मुलांचा आनंद घेऊन आलेली स्टडी टूर संपली.
- प्रिया घाडगे